Friday, September 19, 2008

स्कैनर + स्पीकर

स्कैनर :- स्कैन केलेली माहिती आणि तीची प्रतिमा सिस्टिम युनिट मध्ये प्रक्रिया करू शकेल अशा भाषेत रूपांतरित करण्याच काम स्कैनर करते . स्कैनिंग उपकरणे ३ प्रकारची आहते ओप्टिकल स्कैनर , बार कोड स्कैनर आणि अक्षरे व चिन्हे ओळखणारी उपकरणे .
ओप्टिकल स्कैनर :- याना नुसते स्कैनर असे म्हणतात .माहिती आणि इमेज म्हणजेच प्रतिमा सिस्टिमला वाचता येइल अशा स्वरूपात स्कैन म्हणजे प्रक्रिया करून देतात . ओप्टिकल स्कैनर ला अक्षरे किवा प्रतिमा समजत नाहीत तर अक्षरे आणि प्रतिमा तयार करण्यासाठी प्रकाश , अंधार आणि रग बेरंगी आकर मात्र स्कैनर ला समजतात . स्कैन केलेली माहिती फाइल रुपात संगणका मध्ये साठवली जाते . ती वाचता अथवा प्रिंट ही करता येते . ओप्टिकल स्कैनर चे ही २ प्रकार आहेत
१) फ्लैटबेड स्कैनर :- हयात एखाद्या पेज च्या प्रति बनवण्या साठी स्कैनर च्या काचेवर ते पेज ठेवले जाते तो ते स्कैन करतो.
२) पोर्टेबल स्कैनर :- हे हातात धरून स्कैन करण्याचे उपकरण आहे ,
बार कोड स्कैनर रीडर :- आपण मोठ्या दुकानात किवा शोपिंग मोंल मध्ये अशा प्रकारचे स्कैनर पाहिले असेल अशा प्रकारचे स्कैनर हातात धरून स्कैन केले जाते. काही रीडर विशिष्ट जागी बसवले जाते
त्यानां फ्लैट फॉर्म रीडर असे म्हणतात . त्यात स्कैन केलेले कोड संगणका मध्ये पाठवले जाते त्यात वजन , कीमत आणि वस्तूची उपलब्धी ह्या सर्व माहिती साठवल्या जातात. स्कैनर माहितीची पड़ताळणी करून वस्तूची ताजी माहिती इलेक्टिकल कैश रजिस्टर्ला देतो . हयात वास्तुच्या किमतीचा तपशील ही असतो .
अक्षरे आणि चिन्हे ओळखणारी स्कैनर :- अशा स्वरुपाची स्कैनर अक्षरे आणि चिन्हे ओळखण्यासाठी येतात . विशिष्ट उद्देश साठी अशी स्कैनर वापरली जातात . बैंक मध्ये चेक वर ची अक्षरे ओळखण्यासाठी तसेच पेन्सिल ने केलेली खून ही अनेक पर्याय मधून निवडली आहे का नाही त्या नुसार गुण मोजणी साठी हे उपयोगी पडतात ह्या मध्ये ३ प्रकार आहेत . MICR , OCR, OMR.

No comments: